बिहारच्या राज्य सरकारमधील माजी समाजकल्याण मंत्री परवीन अमानुल्ला यांनी आज(गुरूवार) आम आदमी पक्षात प्रवेश केला त्यामुळे बिहारमधील मुस्लिम मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. अमानुल्ला या नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील एकमेव मुस्लिम महिला मंत्री होत्या. त्यामुळे आगामी निवडणुकीत नितीश कुमार सरकारला फटका बसण्याचे संकेत आहेत.
परवीन अमानुल्ला यांनी नुकताच आपल्या मंत्रिपदासह संयुक्त जनता दलाच्या आमदारकीचाही कोणतेही कारण न सांगता राजीनामा दिला होता. राजीनामा देतेवेळी अमानुल्ला यांनी कोणत्याही प्रकारची तक्रार अथवा टीका मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर केली नव्हती. फक्त सामाजिक कार्य करायचे कारण देत त्यांनी राजीनामा दिला होता. आता त्यांच्या ‘आप’मधील प्रवेशाने बिहार राजकारणात चलबिचल सुरू होण्याची शक्यता आहे.

Story img Loader