ग्रीसचे शेवटचे राजा कॉन्स्टंटाइन द्वितीय यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते हृदयाशी संबंधित आजाराने ग्रस्त होते. यादरम्यान, त्यांना अनेकवेळा रुग्णालयातही दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. रॉटर्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हेही वाचा – ब्राझीलमध्ये धुडगूस घालणाऱ्यांना शिक्षा करा! आता अध्यक्ष लुला यांचे समर्थकही रस्त्यावर
कॉन्स्टंटाइन द्वितीय हे ग्रीसचे माजी राजा किंग पॉल आणि राणी फ्रेडरिका यांचे पुत्र होते. १९६४ मध्ये राजा किंग पॉल यांच्या मृत्यूनंतर कॉन्स्टंटाइन द्वितीय यांना राजा म्हणून घोषित करण्यात आले. मात्र, २१ एप्रिल १९६७ रोजी लष्करी उठावानंतर त्यांना पायउतार व्हावं लागलं. काही महिन्यांनंतर त्यांना देश सोडून जाण्यास भाग पाडण्यात आले. त्यांची कारकीर्द ग्रीसच्या इतिसाहातील सर्वात अशांत कालखंडांपैकी एक मानली जातो.
दरम्यान, १९७४ मध्ये कोन्स्टँटिनोस कॅरामॅनलिस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय एकता सरकारने घेतलेल्या जनमत चाचणीत ग्रीक नागरिकांनी दुसऱ्यांना राजेशाही नाकारली आणि कॉन्स्टंटाइन द्वितीय हे ग्रीसचे शेवटचे राजा ठरले. त्यानंतर अथेन्सने त्यांचे नागरिकत्वदेखील काढून घेतले.