सोव्हिएत युनियनचे माजी नेते आणि रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. शीतयुद्धाच्या काळात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली होती. मात्र, सोव्हिएत युनियनचे विघटन रोखण्यात त्यांना अपयश आले होते.
हेही वाचा – गोध्रा, बाबरीबाबतच्या याचिका निकाली; आता सुनावणी अप्रस्तुत असल्याची सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी
मिखाईल गोर्बाचेव्ह हे किडनीच्या विकाराने दीर्घकाळापासून आजारी होते. गेल्या काही दिवसांत त्यांची तब्येत चांगलीच खालावली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मिखाईल यांच्या निधनानंतर जगभरातून प्रतिक्रिया
मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या निधनानंतर संपूर्ण जगभरातून प्रतिक्रिाया येत आहेत. संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख आँटोन गट्रेस यांनी दु:ख व्यक्त केले आहे. “मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या रुपाने जगाने एक मोठा नेता गमावला आहे. मिखाईल हे शांततेचे पुरस्कर्ते होते, शितयुद्धाच्या काळात त्यांची भूमिका अंत्यत महत्त्वाची होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्वीटद्वारे दिली.
हेही वाचा – मोदींनी मानवता तरी दाखवली!; गुलाम नबी आझाद यांची काँग्रेस नेत्यांवर टीका
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून शोक व्यक्त
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी माजी सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते लवकरच मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतील, अशी माहिती त्यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी दिली आहे.