मालदीवचे माजी अध्यक्ष महंमद नाशीद यांना दहशतवादविरोधी न्यायालयाने १३ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान, नाशीद यांना केलेली अटक व नंतर त्यांना ठोठावलेली शिक्षा याबाबत भारताने चिंता व्यक्त केली असून घटनात्मक चौकटीत काहून मतभेद मिटवण्याचे आवाहन केले आहे.
नाशीद यांच्यावरील खटल्याची सुनावणी काल रात्री झाली. त्यात त्यांना दोषी ठरवून शिक्षा देण्यात आली. २०१२ मध्ये एका न्यायाधीशाला स्थानबद्ध केल्याच्या आरोपावरून त्यांना २२ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. दहशतवादविरोधी कायद्यानुसार त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

Story img Loader