न्यूझीलंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मार्टिन क्रो यांचे गुरूवारी कर्करोगाने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. क्रो यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध केले. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत. क्रो यांना २०१२ मध्ये कर्करोग असल्याचे निदान झाले होते.
मार्टिन क्रो हे न्यूझीलंड क्रिकेट संघाचे प्रमुख फलंदाज होते. क्रो यांनी ७७ कसोटी आणि १४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले होते. क्रो यांनी कसोटीत ४५.३६ च्या सरासरीने ५,४४४ धावा करत १७ शतके झळकावली होती. तर एकदिवसीय कारकीर्दीत त्यांनी ३८.५५च्या सरासरीने ४,७०४ धावा केल्या होत्या. क्रो हे सलग १३ वर्ष न्यूझीलंड संघाचे सदस्य होते. ते चार वर्षे न्यूझीलंडसंघाचे कर्णधार होते. क्रो यांनी आपली शेवटचा कसोटी सामना भारताविरुद्ध खेळला होता.

Story img Loader