पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय पक्षाचे सर्वेसर्वा इम्रान खान यांची पूर्वश्रमीची पत्नी पत्रकार रेहम खान या तिसऱ्यांदा विवाह बंधनात अडकल्या आहे. अभिनेता मिर्झा बिलाल याच्याशी रेहम खान यांनी अमेरिकेत लग्न केलं आहे. ट्वीटरवरून रेहम खान यांनी याबाबतची माहिती दिली. २०१५ साली रेहम खान यांनी इम्रान खान यांच्यापासून घटस्फोट घेतला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मिर्झा बिलाल हे पाकिस्तानी असून अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. ३६ वर्षांचे मिर्झा बिलाल हे एक व्यावसायिक आणि अभिनेता आहेत. मिर्झा बिलाल यांचं यापूर्वी दोनदा लग्न झालं आहे. ४९ वर्षीय रेहम खान यांच्याशी मिर्झा बिलाल यांचं तिसरं लग्न आहे. रेहम खान यांनी ट्वीटरवर एक फोटो शेअर करत लग्नाची माहिती दिली. फोटोवर रेहम खान यांनी लिहलं की, “शेवटी मला तो मिळाला, जाच्यावर मी विश्वास ठेऊ शकेन”.
हेही वाचा : दोन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर केरळचे पत्रकार सिद्दीक कप्पन यांना जामीन मंजूर
रेहम खान यांचं पहिलं लग्न इजाज रेहमान यांच्याशी झालं होतं. मात्र, २००५ साली दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २०१४ साली रेहम खान यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी लग्न केलं. पण, अवघ्या १० महिन्यातच २०१५ साली रेहम खान यांनी इम्रान खान यांच्याशी घटस्फोट घेतला. त्यानंतर आता मिर्झा बिलाल याच्याशी रेहम खान यांनी तिसरं लग्न केलं आहे.
हेही वाचा : ‘बिकिनी किलर’ चार्ल्स शोभराज १९ वर्षांनी बाहेर, नेपाळच्या तुरुंगातून सुटका
रेहम खान कोण आहे?
रेहम खान या इम्रान खान यांच्याशी लग्न केल्यानंतर चर्चेत आल्या होत्या. तेव्हा इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान नव्हते. मात्र, पीटीआय पक्षाचे सर्वेसर्वा होते. रेहम खान यांचा जन्म ३ एप्रिल १९७३ साली लीबियामध्ये झाला होता. रेहम खान यांनी आपलं शिक्षण पेशावरमधील जिन्ना कॉलेजमधून पूर्ण केलं. २००८ साली बीबीसीमधून खान यांनी कामाला सुरुवात केली. त्यानंतर २०१५ सालापासून रेहम खान या पाकिस्तानमधील ‘डॉन न्यूज’मध्ये ‘द रेहम खान शो’ करत होत्या.