Imran Khan Supporters Protest in Pakistan : पाकिस्तानमध्ये तुरूंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांच्या समर्थकांकडून जोरदार निदर्शने केली जात आहेत. तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या आवाहनानंतर देशभरातून पक्ष समर्थकांचे ताफे शक्ती प्रदर्शन करत राजधानी इस्लामाबादकडे कूच करत आहेत. सरकारकडून मात्र पीटीआयच्या कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. याबरोबरच त्यांना इस्लामाबादकडे येण्यापासून रोखण्याकरिता अश्रुधूर तसेच बळाचा वापरदेखील करण्यात येत आहे.

इस्लामाबादकडे निघालेल्या तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या कार्यकर्त्यांना सरकारी यंत्रणांच्या जोरदार विरोधाला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तानमधील खैबर-पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर आणि विरोधी पक्षनेते उमर अयुब यांच्या नेतृत्वाखालील पीटीआय समर्थकांचा मोठा ताफा पंजाबमार्गे स्वाबीहून इस्लामाबादला जात होता. या ताफ्यातील पीटीआय समर्थकांना पांगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अश्रुधूराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला. अट्टोक ब्रिज, चाच इंटरचेंज आणि गाझी बरोथा कॅनॉल या भागात हा प्रकार घडला. याबद्दल एक्सप्रेस ट्रिब्यूनने वृत्त दिले आहे.

Nitin Gadkari on Road Accidents
Nitin Gadkari: ‘मी तेव्हा माझे तोंड लपवतो’, नितीन गडकरींनी लोकसभेत बोलताना व्यक्त केली खंत
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Deputy Chief Minister Eknath Shinde consoled the family of Raghunath More thane news
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Aba Bagul, Parvati Assembly Constituency,
‘बंडखोर’ आबांचे घरवापसीसाठी ‘आर्जव’
alibag Adv Aswad Patil resigned from post of district secretary of Shekap
अॅड. आस्‍वाद पाटील यांचा अखेर राजीनामा
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला

स्वाब येथून निघालेल्या पीटीआय समर्थकांच्या ताफ्याचा प्रवास ते पंजाब प्रांतात प्रवेशकरेपर्यंत सुरळीत सुरू होता. मात्र पुढे त्यांना सरकारी यंत्रणांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. यावेळी गंडापूर यांना पक्षाच्या समर्थकांना संबोधित केले. जोपर्यंत पीटीआयचे नेते इम्रान खान यांची सुटका होत नाही, तोपर्यंत आपला मोर्चा माघारी फिरवणार नसल्याचे गंडापूर यांनी यावेळी जाहीर केले. पुढे गाझी येथेदेखील त्यांनी समर्थकांना संबोधित करताना पुढील प्रतिकारासाठी तयार राहण्याचे आवाहन केले.

पीटीआय समर्थकांचा ताफा गाझी पुलावर काही काळासाठी थांबवण्यात आला होता. यावेळी काही प्रमाणात पीटीआय पक्षाअंतर्गत मतभेद समोर आल्याचे पाहायला मिळाले. येथे गंडापूर यांनी पुढील संघर्षाच्या आधीकार्यकर्त्यांना काहीवेळ आराम करण्याचा सल्ला दिला. तर दुसरीकडे इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांनी मात्र होत असलेल्या उशीराबद्दल नाराजी व्यक्त करत विनाकारण वेळ वाया घालवला जात असल्याचे तक्रार केली. तसेच जराही उशीर न करता ताफा पुढे घेऊन जाण्याची विनंती केली.

इस्लामाबादमध्ये होणार आंदोलन

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाकडून कार्यकर्त्यांना इस्लामाबाद येथे एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी पीटीआयने इस्लामाबादच्या दिशेने मोर्चाचे आयोजन केले आहे. पक्षाकडून इस्लामाबाद शहरातील डी-चौकात आंदोलन केले जाणार आहे. हे आंदोलन स्वातंत्र्य आणि न्यायाची लढाई असल्याचे पीटीआयने म्हटले आहे. पक्षाने इम्रान खान यांना झालेल्या अटकेविरोधात आंदोलनाची भूमिका घेतल्याने देशात राजकीय तणाव वाढताना दिसत आहे.

एकीकडे सरकारच्या विरोधानंतरही पीटीआयने कार्यकर्त्यांना इस्लामाबादमधील डी-चौकात येण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान सरकारकडून या रॅलीचे आयोजन रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देऊन इस्लामाबादमध्ये कोणत्याही आंदोलनास परवानगी दिली जाणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे. तसेच गृह मंत्रालयाने कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील दिला आहे.

आंदोलकांना रोखण्यासाठी सरकारची जोरदार तयारी

या घडामोडींदरम्यान पीटीआयचे नेते अमीर डोगर आणि झेन कुरेशी यांना पंजाब पोलीसांनी मुल्तान येथे अटक केली आहे. या दोन नेत्यांच्या अटकेनंतर तणाव आणखीच वाढला आहे. राजधानीकडे येणारे रस्ते बंद करून आंदोलनकर्त्यांना रोखण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. यादरम्यान पीटीआयचे नेते मात्र आंदोलनावर ठाम आहेत. गंडापूर यांनी आपण रस्त्यातील अडथळे दूर करण्यासाठी खाजगी यंत्रणा आणू असेही जाहीर केले आहे. तसेच त्यांनी कोणतीही अडथळा आपल्याला डी-चौकात आंदोलन करण्यापासून रोखू शकणार नाही असा निर्धारही व्यक्त केला आहे.

हेही वाचा >> हिंसाचारात तीन ठार; उत्तर प्रदेशात मशिदीच्या सर्वेक्षणाला विरोध, जमावाचा पोलीसांशी संघर्ष

दुसरीकडे सरकारकडून इस्लामाबादच्या बाहेर जोरदार नाकेबंदी करण्यात येत आहे. प्रमुख रस्ते बंद करत आणि शहरभर अडथळे उभारून या आंदोलनाला थोपवण्याची तयारी करण्यात आली आहे. तसेच मोठ्या संख्येने सुरक्षा दलांना शहरातील संवेदनशील भागात तैनात करण्यात आले आहे. प्रशासनाने डी-चौक, इस्लामाबाद विमानतळ अशा महत्वाच्या भागात जाणाऱ्या रस्त्यांवर नाकेबंदी केली आहे. शहरात येणाऱ्या रस्त्यांवर देखील कंटेनर्स ठेवून अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. मात्र याचा सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

याबरोबरच पाकिस्तान सरकारने माजी एमएनए नफिसा खट्टक यांच्यासह अनेक पीटीआय कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. लाहोर आणि पंजाबच्या इतर भागांमध्येदेखील काही जणांना अटक करण्यात आली आहे, एक्सप्रेस ट्रिब्यूनने यांसंबधी वृत्त दिले आहे.

इम्रान खान याच्या समर्थकांकडून होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी, तसेच शहरातील महत्त्वाचे भाग सुरक्षित राहावेत यासाठी, संवेदनशील भागांमध्ये इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा बंद केली जाऊ शकते, असे पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

Story img Loader