पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर शनिवारी लंडनमध्ये हल्ला झाल्याचं वृत्त समोर आलंय. पाकिस्तानमधील फॅक्ट फोकसचे रिपोर्टर अहमद नुरानी यांनी ट्विटरवर सांगितले की, सत्ताधारी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या कार्यकर्त्याने नवाझ शरीफ यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात नवाझ शरीफ यांचा सुरक्षारक्षक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
पीटीआयचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना विरोधकांनी त्यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील महत्त्वपूर्ण मतदानाला सामोरे जाण्याच्या एक दिवस आधी नवाझ शरीफ यांच्यावर हल्ला करण्यात आला. अविश्वास प्रस्ताव यशस्वी झाल्यास पाकिस्तान मुस्लिम लीगचे (एन) नवाझ शरीफ यांचे भाऊ शेहबाज शरीफ हे पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार असतील.
तर, नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हणाली की, “हिंसाचार करणाऱ्या सत्ताधारी पक्षाला तुरुंगात टाकले पाहिजे. इम्रान खानवर लोकांना चिथावणी देणे आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. पीटीआयचे नेते जे हिंसाचाराचा अवलंब करतात किंवा कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करतात त्यांना अटक करून तुरुंगात टाकले पाहिजे, त्यात इमरान खान यांचा समावेश आहे. त्यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे,” अशी मागणी तिने केली.
दरम्यान, पाकिस्तानच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. पाकिस्तानच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये आज पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. पाकिस्तानातील विरोधी पक्ष पीएमएल-एन आणि पीपीपी यांनी इम्रान खान यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असून, इम्रान खान यांनी संसदेत बहुमत गमावले आहे आणि त्यांना तत्काळ राजीनामा द्यावा लागेल, असं म्हटलं आहे.