माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना मूत्रसंसर्ग झाला असून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. त्यांचे डायलसिस झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे एम्सने आपल्या मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, भाजपा नेते विजय गोयल यांनीही वाजपेयींची प्रकृती स्थिर असल्याचे माध्यमांना सांगितले असून उद्या त्यांना डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही वाजपेयींची प्रकृती स्थिर असून चिंतेची कुठलीच बाब नसल्याचे म्हटले.

दरम्यान, सोमवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी एम्स रूग्णालयात जाऊन अटलबिहारी वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी तेथील डॉक्टरांशी चर्चाही केली.

Story img Loader