माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ ( PTI ) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना मंगळवारी ( ९ मे ) अटक करण्यात आली. इस्लामाबाद न्यायालयातून पाकिस्तानच्या निमलष्करी दलानं इम्रान खान यांना अटक केली आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ही अटक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

इम्रान खान हे पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान होते. त्यांचा कार्यकाळ १८ ऑगस्ट २०१८ ते १० एप्रिल २०२२ पर्यंत होता. एप्रिल महिन्यात त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणत सत्तेतून खाली खेचण्यात आलं होतं. त्याच इम्रान खान यांच्या संपत्तीविषयी जाणून घेणार आहोत.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

हेही वाचा : विश्लेषण : इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट, पाकिस्तानमधील ‘तोशखाना प्रकरण’ नेमकं काय?

२९ मिलियन डॉलर किमतीचं एक घर अन्…

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान यांची एकूण संपत्ती ५० मिलियन डॉलर ( ४१० कोटी भारतीय रुपये ) आहे. ७० वर्षीय इम्रान खान हे पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत राजकारणी समजले जातात. इम्रान खान यांची इस्लामाबादमधील बानी गाला येथे १,८१,५०० वर्ग गज ( १६,३३,५०० स्क्वेअर फूट ) परिसरात ७५० मिलियन डॉलरची हवेली आहे. त्याशिवाय जमान पार्क लाहौरमध्येही २९ मिलियन डॉलर किमतीचं एक घरही इम्रान खान यांच्याजवळ आहे.

विदेशी बँकातही पैसा

०.८ मिलियन डॉलरचा फार्महाऊसही इम्रान खान यांच्यापशी आहे. तसेच, विविध व्यवसाय आणि शेतजमिनीत इम्रान खान यांनी गुंतवणूक केली आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या कागदपत्रांमध्ये इम्रान खान यांच्याजवळ ५० हजार रूपयांच्या चार शेळ्या आणि १५० एकर शेतजमिनीचा उल्लेख आहे. चार विदेशी मुद्रा बँकेतही इम्रान खान यांचे खाते आहेत. त्यातील पाउंड खात्यात २०६७ पाउंड, डॉलरच्या खात्यात ३,२९,६० डॉलर आणि अन्य खात्यात १,४७० डॉलर आहेत.

हेही वाचा : अग्रलेख : विनोदी, विस्कळीत, विदीर्ण..

हेलिकॉप्टर आहे, पण कार नाही…

इम्रान खान यांच्या नावावर कोणत्याही गाडीची नोंदणी नाही. पण, इम्रान खान यांच्याजवळ एक हेलिकॉप्टर आहे. तसेच, ३.५ कोटी रुपयांची टोयोटा लँड क्रूझर आणि १२.२६ कोटी रुपयांची मर्सिडीज मेबँक एस ६०० चा वापर करताना दिसतात.