पीटीआय, जयपूर
‘काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दिलेला शब्द पाळतीलच असे नाही’, अशा शब्दांमध्ये भाजप नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनी त्यांच्यावर टीका केली.
काँग्रेसने २०१८च्या निवडणुकीआधी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप पूर्ण कर्जमाफी मिळालेली नाही असे त्या म्हणाल्या. काँग्रेसने आता दिलेल्या वचनांची अवस्था आधीच्या आश्वासनाप्रमाणेच होईल असा अंदाज वसुंधराराजे यांनी वर्तवला.