भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे यांनी तिसऱ्यांदा लग्न केलं आहे. ब्रिटिश नागरिक असलेल्या ट्रिनासह त्यांनी विवाह केला आहे. हरिश साळवे आणि ट्रिना यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. हरिश साळवेंच्या लग्न सोहळ्याला नीता अंबानी, ललित मोदी, उज्जवला राऊत यांच्यासह इतर काही प्रतिष्ठितांची उपस्थिती होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हरिश साळवे यांच्या पहिल्या पत्नीचं नाव मीनाक्षी होतं. ३८ वर्षांच्या संसारानंतर हरिश साळवे यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर २०२० मध्ये ब्रिटिश महिला कॅरोलिनसह हरीश साळवे विवाहबद्ध झाले होते. आता त्यांनी तिसरं लग्न केलं आहे. ब्रिटनमध्ये हरिश साळवेंचा विवाह सोहळा पार पडला.

६८ वर्षीय हरिश साळवे हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टीस करतात. देशातल्या हायप्रोफाई खटल्यांमध्ये त्यांचा सहभाग होता. कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात हरिश साळवेंनी बाजू मांडली आहे. टाटा समूहाचेही ते वकील आहेत. तसंच अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणातही त्यांनी सलमान खानची बाजू मांडली होती.

नोव्हेंबर १९९९ ते २००२ पर्यंत भारताचे सॉलिसिटर म्हणून हरीश साळवे कार्यरत होते. त्यानंतर हरीश साळवे यांची नियुक्ती वेल्स आणि इंग्लंडच्या न्यायालयांसाठी राणी वकील म्हणून करण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former solicitor general of india harish salve ties knot for the 3rd time scj