कोलकाता

पश्चिम बंगालमधील कथित स्वस्त धान्य घोटाळय़ाच्या संबंधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी बनगाव नगरपालिकेचे माजी अध्यक्ष शंकर आद्या यांना अटक केली. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आपल्या अधिकाऱ्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला तसेच वाहनांवर दगडफेक केली असा आरोप ईडीकडून करण्यात आला. यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पोलिसांनी जमावावर लाठीमार केला.

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
nana patole replied to devendra fadnavis
“आरएसएससुद्धा धार्मिक संघटना, मग त्यांनी…”; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर!

दरम्यान, शुक्रवारी जमावाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ईडीच्या तीन अधिकाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. ज्यांच्या समर्थकांनी अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता, ते तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहान शेख यांच्यासाठी ईडीने ‘लुकआऊट नोटीस’ जारी केली आहे.

हेही वाचा >>> बांगलादेशात आज कडेकोट बंदोबस्तात मतदान

उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे नेते आद्या आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित मालमत्तांवर छापे घातल्यानंतर आद्या यांना बनगावमधील त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली. ‘या छाप्यांसोबतच आद्या यांची चौकशीही करण्यात आली. त्यांची उत्तरे समाधानकारक नसल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली’, असे ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, विविध घोटाळय़ांमध्ये अटक करण्यात आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना राज्याबाहेरील कारागृहांमध्ये ठेवण्यात यावे, अशी मागणी भाजपने केली आहे.

हेही वाचा >>> लोकांच्या प्रश्नांवर यात्रा! संसदेत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करू न दिल्याचा काँग्रेस अध्यक्षांचा आरोप

शहाजहान शेखविरुद्ध नोटीस

तृणमूलचे नेते शहाजहान शेख यांच्या समर्थकांनी छाप्यादरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केल्यानंतर दुसऱ्या दिवशी, शनिवारी ईडीने शेख यांच्यासाठी ‘लुकआऊट नोटीस’ जारी केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

जखमी अधिकाऱ्यांची प्रकृती स्थिर

दरम्यान, संदेशखाली येथील शुक्रवारच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ईडीच्या तीन अधिकाऱ्यांची प्रकृती सुधारली असून ती आता स्थिर आहे. दोन अधिकाऱ्यांना लवकर सुटी मिळू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले.