ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या अडचणी कमी व्हायचं नाव घेत नाही. पंतप्रधानपदानंतर आता जॉन्सन यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. ‘पार्टीगेट’ प्रकरणामुळे जॉन्सन यांना राजीनामा देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या जागेवर पुन्हा निवडणूक लागण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं प्रकरण काय?

करोनाकाळात ब्रिटनमध्ये टाळेबंदी आणि संचारबंदी सुरु होती. तेव्हा निर्बंधांच्या काळातही डाउनिंग स्ट्रीट या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं. ‘पार्टीगेट’ नावाने हे प्रकरण जगभर गाजलं. तसेच, संसदेची दिशाभूल केल्याचा आरोपही जॉन्सन यांच्यावर करण्यात आला होता.

हेही वाचा : ChatGpt चे निर्माते सॅम ऑल्टमन यांनी घेतलेल्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी केले ट्वीट; म्हणाले, “भारताची टेक…”

याच प्रकरणात जॉन्सन यांना १० दिवसांपेक्षा अधिक काळ निलंबीत करण्यात यावे, अशी मागणी संसदेची विशेषाधिकारी समिती करण्याची शक्यता होती. त्यापूर्वीच जॉन्सन यांनी राजीनामा दिला आहे.

हेही वाचा : भारतीयांची व्हिसा प्रतीक्षा कमी करावी; अमेरिकी सिनेटरची राष्ट्राध्यक्षांना विनंती

माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की, “विशेषाधिकार समितीचं पत्र मला मिळालं आहे. त्यातून स्पष्ट होतं की, संसदेतून माझी हकालपट्टी करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांनी पुरावे पाहण्याआधीच माझ्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former uk prime minister boris johnson resign mp over party gate case ssa