Donald Trump Wife Death : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली पत्नी इव्हाना ट्रम्प यांचे निधन झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत माहिती दिली आहे. इव्हाना ट्रम्प एक अद्भुत आणि सुंदर महिला होती जिने एक उत्कृष्ट आणि प्रेरणादायी जीवन जगले, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. इव्हाना यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ट्रम्प टॉवरसह अनेक इमारती बनवण्यात मदत केली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवरुन याबाबत माहिती दिली. इव्हाना ट्रम्प यांचे गुरुवारी वयाच्या ७३ व्या वर्षी न्यूयॉर्क शहरात निधन झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. “तुम्हा सर्वांना कळवताना मला अतिशय दु:ख होत आहे की इव्हाना ट्रम्प यांचे न्यूयॉर्क शहरात निधन झाले आहे. तुमच्यापैकी बहुतेकांना ती सर्वात जास्त आवडत होत. ती एक अद्भुत, सुंदर आणि अद्भुत स्त्री होती. इव्हाना एक उत्तम आणि प्रेरणादायी जीवन जगली आहे. इव्हाना ट्रम्प यांची तीन मुले डोनाल्ड ज्युनियर, इवांका आणि एरिक यांना तिचा खूप अभिमान आहे,” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : पंतप्रधान मोदी सहभागी होत असलेली I2U2 शिखर परिषद काय आहे?

इव्हाना ट्रम्प या एक मॉडेल होत्या. त्यांनी १९७७ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत लग्न केले आणि १९९२ मध्ये घटस्फोट घेतला. इव्हाना ट्रम्प यांनी १९८० च्या दशकात ट्रम्प यांची माध्यमांमध्ये प्रतिमा तयार करण्याची भूमिका बजावली होती.

टाईम्स वृत्तसंस्थेने सांगितले की त्यांनी ट्रम्प टॉवर, मॅनहॅटनमधील फिफ्थ अव्हेन्यूवरील इमारत आणि अटलांटिक सिटी, न्यू जर्सीमधील ट्रम्प ताजमहाल कॅसिनो रिसॉर्ट यासारखे इतर हाय-प्रोफाइल प्रकल्प विकसित करण्यासाठी पतीसोबत काम केले. इव्हाना ट्रम्प या ट्रम्प संस्थेच्या इंटिरियर डिझाइनच्या उपाध्यक्ष होत्या. त्या ऐतिहासिक प्लाझा हॉटेल सांभाळत होत्या.

डोनाल्ड ट्रम्प यांचे तीन विवाह

डोनाल्ड ट्रम्प आणि इव्हाना ट्रम्प, ८० च्या दशकात न्यूयॉर्क शहरातील सर्वात हाय प्रोफाइल जोडप्यांपैकी एक होते. त्यांचा ९० च्या दशकाच्या सुरुवातीला घटस्फोट झाला. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी १९९३ मध्ये अभिनेत्री मार्ला मॅपल्सशी लग्न केले. ट्रम्प यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि १९९९ मध्ये त्यांनी मॅपल्सला घटस्फोट दिला. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी २००५ मध्ये मेलानिया ट्रम्प यांच्याशी लग्न केले.

Story img Loader