सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे निधन झाले आहे. नवी दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलभ इंटरनॅशनलच्या मध्यवर्ती कार्यालयात ध्वजारोहणानंतर त्यांची तब्येत अचानक खालावल्यानं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. दोन दिवसांपूर्वी ते एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाटणा येथे पोहोचले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशनची स्थापना दिवंगत बिंदेश्वर पाठक यांनी १९७० मध्ये केली होती. बिंदेश्वर पाठक यांची ओळख भारतीय समाजसुधारकांपैकी एक म्हणून आहे. त्यांनी सुलभ इंटरनॅशनलची स्थापना केली, जी मानवी हक्क, पर्यावरणीय स्वच्छता, ऊर्जेचे अपारंपरिक स्त्रोत, कचरा व्यवस्थापन आणि सामाजिक सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करते.

हेही वाचाः पंतप्रधान मोदींच्या ‘मी पुन्हा येईन’ या वक्तव्यावर काँग्रेसची टीका, “पुढच्या वर्षी मोदी….”

तीन दशकांपूर्वी डिझाइन केलेल्या सुलभ टॉयलेटला किण्वन संयंत्रांशी जोडून त्यांनी बायोगॅस निर्मितीचा अभिनव प्रयोग केला. जगभरातील विकसनशील देशांमध्ये स्वच्छतेचा समानार्थी शब्द त्यांच्यामुळेच निर्माण झाला असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. विशेषत: स्वच्छता या क्षेत्रातील त्यांच्या अग्रगण्य कार्यामुळे त्यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

हेही वाचाः स्वातंत्र्य दिन म्हणजे साम्राज्यवादातून प्रजासत्ताकवाद; सरन्यायाधीशांचे प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. “डॉ. बिंदेश्वर पाठक यांचे निधन हे आपल्या देशाचे मोठे नुकसान आहे. ते एक दूरदर्शी होते, ज्यांनी सामाजिक प्रगतीसाठी आणि दलितांच्या सशक्तीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर कार्य केले. बिंदेश्वरजींनी स्वच्छ भारत घडवणे हे त्यांचे ध्येय बनवले. स्वच्छ भारत मिशनसाठी त्यांनी मोलाचे सहकार्य केले. आमच्या विविध संभाषणांमध्ये स्वच्छतेबद्दलची त्यांची तळमळ नेहमीच दिसून आली,” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Founder of sulabh international bindeshwar pathak passed away breathed his last at aiims delhi vrd