पीटीआय, जम्मू

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत एका कॅप्टनसह चार जवान शहीद झाले. कॅप्टन ब्रिजेश थापा, नायक डी. राजेश, जवान ब्रिजेंद्र तसेच अजय अशी शहीद जवानांची नावे आहेत. या चकमकीनंतर परिसरातील शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

देसा वनक्षेत्रात धारी गोटे उरबागी येथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू पोलिसांच्या विशेष पथकाने शोधमोहीम (पान ८ वर) (पान १ वरून) सुरु केली. दहशतवाद्यांनी पथकावर गोळीबार करून पळ काढला. दाट झाडी व प्रतिकूल वातावरणात कॅप्टन थापा यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी झालेल्या चकमकीत पाच जवान गंभीर जखमी झाले. त्यातील चौघांना वीरमरण आले. दहशतवादी सीमेपलीकडून आले असून, एक-दोन महिने जंगलात लपून बसल्याची माहिती आहे. किश्तवाड जिल्ह्यालगत घडी भगव जंगलात ९ जुलै रोजी याच दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>मध्य, पश्चिम रेल्वे फलक हटविणार; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कार्यवाही

‘दहशतवाद्यांची आधारस्थळे उद्ध्वस्त करा’

शहीद कॅप्टन थापा यांचे वडील कर्नल (निवृत्त) बुवनेश थापा यांनी आपल्या मुलाच्या सर्वोच्च बलिदानाचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया दिली. त्याच वेळी जम्मू-काश्मीरमधील अतिरेक्यांची आधारस्थळे शोधून नष्ट करावीत, असे आवाहनही त्यांनी सरकारला केले. दहशतवाद्यांना मदत करणारे अनेक लोक आहेत. त्यांचा सर्वांत मोठा धोका असल्याचे कर्नल थापा म्हणाले. त्यांनी स्वत: जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी सेवा दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four army jawans martyred in kashmir amy