‘इसिस’ या सुन्नी जिहादी गटात सहभागी होण्याचा शहरातील चार तरुणांच्या एका गटाचा प्रयत्न हैदराबाद पोलिसांनी हाणून पाडला. सदर तरुण २३ ते २५ वर्षे वयोगटातील असून त्यांपैकी दोघे जण अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी आहेत.
या चार तरुणांना गेल्या आठवडय़ात कोलकाता येथून ताब्यात घेण्यात आले. तेथून इराकला पसार होण्याचा त्यांचा डाव होता. समाजमाध्यमांवरील जाहिरातींकडे हे तरुण आकर्षित झाले होते, असे एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

 

Story img Loader