त्रिपोली व टय़ुनिस येथून भारतात परत येण्यास निघालेल्या चार भारतीय शिक्षकांचे अपहरण करण्यात आले असून त्यात इसिसचा हात आहे. अपहृतांपैकी दोन जण हैदराबादचे असून एक रायचूरचा तर एक बंगळुरूचा आहे, असे सरकारने सांगितले. दरम्यान त्यातील दोन प्राध्यापक सुखरूपणे विद्यापीठात परतले आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले की, लक्ष्मीकांत व विजयकुमार यांची सुटका करण्यात यश आले असून इतर दोघांची सुटका करण्याचे प्रयत्न चालू आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या चौघांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावा असे आवाहन आंध्र प्रदेशने केले आहे. सिरते या शहरापासून ५० कि.मी अंतरावर एका नाक्यावर या चार भारतीयांना इसिसने ताब्यात घेतले आहे. ते तिघेही सिरते विद्यापीठातील प्राध्यापक असून एक जण या विद्यापीठाच्या जुफ्रा शाखेत काम करीत होता असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले. आम्ही संबंधितांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत व त्यांच्या सुखरूप सुटकेचे प्रयत्न चालू आगेत असे सांगून ते म्हणाले की, २९ जुलैला रात्री ११ वाजता त्रिपोली येथील भारतीय दूतावासाला या चार जणांच्या अपहरणाची माहिती मिळाली होती. त्रिपोली येथील दूतावास प्रमुखांच्या माध्यमातून या घटनेबाबत माहिती घेतली जात आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजून तरी खंडणीची मागणी करण्यात आलेली नाही. त्यांना जेथून पळवण्यात आले तो इसिसच्या नियंत्रणाखालील भाग असून तेथे खिलाफत राजवट आहे. भारत सरकारने गेल्या जुलैमध्ये लोकांना लिबियातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.
इराकमध्ये ३९ भारतीय बेपत्ता असतानाच आता ४ शिक्षकांचे अपहरण झाले आहे. सुन्नी बंडखोर व सरकारी दले यांच्यातील संघर्षांत अनेकांना गेल्या वर्षी ओलिस ठेवण्यात आले होते, त्यातील ३९ जणांची सुटका करण्यात आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा