आसामच्या कारबी अँगलाँग जिल्ह्य़ात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार सर्वसामान्य नागरिक ठार झाले. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांवर प्रतिहल्ला केला, त्यात दोन दहशतवादी ठार झाले.
कारबी पीपल्स लिब्रेशन टायगर्स (केपीएलटी) या संघटनेचे दहशतवादी गुरुवारी रात्री खोवानीगाव येथे आश्रयास होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी गावातील तीन महिलांसह चौघांवर गोळीबार केला. त्यात हे चौघेही ठार झाले. या हल्ल्यानंतर दहशतवादी गावाजवळील जंगलात पळून गेले. ‘नागा रेंजमा हिल्स प्रोटेक्शन फोर्स’च्या जवानांनी त्यांच्यावर जंगलात हल्ला केला. त्यात दोन दहशतवादी ठार झाले.

Story img Loader