दिल्लीच्या पालम भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या परिसरात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये दाम्पत्यासह २२ वर्षीय तरुणी आणि आजीचा समावेश आहे. अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या २५ वर्षीय केशवने व्यसनमुक्ती केंद्रातून परतताच कुटुंबियांना संपवलं आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Shraddha Murder Case: दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आणखी एक पुरावा, आफताबच्या बाथरूममध्ये…; तपासाला वेग

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू

४२ वर्षी दिनेश कुमार, त्यांच्या पत्नी दर्शना सैनी, ७५ वर्षीय दिवानो देवी आणि २२ वर्षीय उर्वशीचा केशवने खून केला आहे. आरोपी केशव हा बेरोजगार होता. ड्रग्जच्या आहारी गेल्यानं कुटुंबियांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलं होतं. दिल्लीच्या दक्षिण-पश्चिम भागात घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर दोघांचे मृतदेह बाथरुममध्ये आढळून आले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरू आहे.

आत्महत्या, बलात्कार आणि खूनाचे गंभीर आरोप, आता सीबीआयने सांगितलं दिशा सालियनच्या मृत्यूचं नेमकं कारण

दरम्यान, आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबियांमधील भांडणातून हा गुन्हा घडल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. पालम परिसरातून एका व्यक्तीने मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिसांना फोन करून हत्येची घटना घडल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांना चारजण रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. घटनेनंतर पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला शेजाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.