लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : जिशानने आई शमीमला रशियातून दूरदृश्यप्रणालीद्वारे संपर्क साधला तेव्हा भारतात रात्रीचे सव्वाअकरा वाजले होते. आतेबहीण जिया कशी नदीत गुडघाभर पाण्यात उतरली आहे, हे तो आनंदाने आईला दाखवित होता. त्यावेळी आईने जिशानला लवकर पाण्याबाहेर पडण्यास सांगितले. त्यानेही लगेच आम्ही घरी जात असल्याचा लघुसंदेश व्हॉटसअॅपवर पाठविला. परंतु, त्यानंतर अवघ्या १५ मिनिटात होत्याचे नव्हते झाले.

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Milind Gawali
“या पाच वर्षांत…”, ‘आई कुठे काय करते’मधील भूमिकेबद्दल मिलिंद गवळींचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “अनिरुद्धला…”
people are lucky who got love from grandma emotional video
“आजी म्हणजे काय?” VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ” ज्या लोकांना आज्जीचे प्रेम मिळाले…”
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
Aruna Sabane asked harassed Priya Phuke is not beloved BJP sister
प्रिया फुके ही सरकारची ‘लाडकी बहीण ‘नाही आहे का? सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांचा सवाल
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…

जिया, जिशानसह जळगाव जिल्ह्यातील हर्षल देसले आणि मुंबईतील एक असे चौघे नदीच्या पाण्यात वाहून गेले. त्यापैकी हर्षलचा मृतदेह सापडला असून इतर मृतदेहांचा शोध सुरु आहे. ‘यारोस्लाव-द-वाइज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटी’ परिसरात मंगळवारी ही घटना घडली.

शमीम आणि अशपाक पिंजारी यांचा मुलगा जिशान आणि अशपाक यांच्या बहिणीची मुलगी जिया हे दोघेही गेल्या वर्षी एमबीबीएसच्या शिक्षणासाठी रशियाला गेले होते. जिशानला एक बहीण तर जियाला एक भाऊ आहे. अशपाक पिंजारी शेतकरी आहेत.

हेही वाचा >>>महायुतीत जागा वाटपाचा घोळ सुरुच, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघावर भाजपचाही दावा

हर्षल देसलेच्या घरी विद्यापीठाकडून कळवण्यात आले. त्याने मंगळवारी रात्री घरी संपर्क साधला होता. त्यानंतर सकाळी त्याच्याशी कुटुंबियांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा भ्रमणध्वनी संच बंद होता.

रशियामध्ये विद्यार्थ्यांचा शोध घेतला जात आहे. भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधून सर्व माहिती दिली. रशियन सरकारकडून विद्यार्थ्यांचे मृतदेह पाठविण्यासाठी प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. – आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव