लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जळगाव : जिशानने आई शमीमला रशियातून दूरदृश्यप्रणालीद्वारे संपर्क साधला तेव्हा भारतात रात्रीचे सव्वाअकरा वाजले होते. आतेबहीण जिया कशी नदीत गुडघाभर पाण्यात उतरली आहे, हे तो आनंदाने आईला दाखवित होता. त्यावेळी आईने जिशानला लवकर पाण्याबाहेर पडण्यास सांगितले. त्यानेही लगेच आम्ही घरी जात असल्याचा लघुसंदेश व्हॉटसअॅपवर पाठविला. परंतु, त्यानंतर अवघ्या १५ मिनिटात होत्याचे नव्हते झाले.
जिया, जिशानसह जळगाव जिल्ह्यातील हर्षल देसले आणि मुंबईतील एक असे चौघे नदीच्या पाण्यात वाहून गेले. त्यापैकी हर्षलचा मृतदेह सापडला असून इतर मृतदेहांचा शोध सुरु आहे. ‘यारोस्लाव-द-वाइज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटी’ परिसरात मंगळवारी ही घटना घडली.
शमीम आणि अशपाक पिंजारी यांचा मुलगा जिशान आणि अशपाक यांच्या बहिणीची मुलगी जिया हे दोघेही गेल्या वर्षी एमबीबीएसच्या शिक्षणासाठी रशियाला गेले होते. जिशानला एक बहीण तर जियाला एक भाऊ आहे. अशपाक पिंजारी शेतकरी आहेत.
हेही वाचा >>>महायुतीत जागा वाटपाचा घोळ सुरुच, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघावर भाजपचाही दावा
हर्षल देसलेच्या घरी विद्यापीठाकडून कळवण्यात आले. त्याने मंगळवारी रात्री घरी संपर्क साधला होता. त्यानंतर सकाळी त्याच्याशी कुटुंबियांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा भ्रमणध्वनी संच बंद होता.
रशियामध्ये विद्यार्थ्यांचा शोध घेतला जात आहे. भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधून सर्व माहिती दिली. रशियन सरकारकडून विद्यार्थ्यांचे मृतदेह पाठविण्यासाठी प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. – आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव