४७ जखमींपैकी १० जणांची प्रकृती गंभीर

मध्य पॅरिस येथे एका बेकरीत शनिवारी झालेल्या शक्तिशाली स्फोटात ४ ठार तर ४७ जण जखमी झाले असल्याची माहिती अंतर्गत सुरक्षा मंत्री ख्रिस्तोफी कॅस्टनर यांनी दिली, मृतात दोन अग्निशमन जवानांचा समावेश आहे. पॅरिसच्या महापौर अ‍ॅनी हिंडलागो यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींमध्ये १० जणांची प्रकृती गंभीर आहे. स्फोटात  आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. यावेळी वायुगळती झाल्याची शक्यता आहे असे एएफपीचे पत्रकार व पोलीस यांनी सांगितले. ग्रीनिच स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजता हा स्फोट झाला असून पॅरिसमधील नवव्या जिल्ह्य़ात ही घटना निवासी व दुकाने असलेल्या भागात झाली. ट्विटरवर त्याची छायाचित्रे टाकण्यात आली असून त्यात रस्त्यावर ढिगारा पडलेला दिसत आहे. इमारतीचा खालचा भाग त्यात कोसळला असून ज्वाळा दिसत आहेत. या इमारतीत लावलेल्या मोटारींचे नुकसान झाले आहे. एका व्यक्तीस स्ट्रेचरवरून नेताना एएफपीच्या छायाचित्रकाराने पाहिले. अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्याचा प्रयत्न करीत असून काही लोकांना शिडी लावून बाहेर काढण्यात आले. आपत्कालीन कर्मचारी हे जखमींना मदत करीत आहेत.

Story img Loader