‘इसिस’चे समर्थक असलेल्या चार कार्यकर्त्यांना गेल्या वर्षी देशातून अटक करण्यात आली असून त्यापैकी दोघांना महाराष्ट्रातून तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून प्रत्येकी एकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्यसभेत बुधवारी देण्यात आली.
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि राज्य पोलिसांकडून या सर्वाची चौकशी करण्यात येत आहे. मात्र या कार्यकर्त्यांना परदेशातून निधी उपलब्ध होत असल्याबद्दलची माहिती अद्याप हाती लागलेली नाही, असे गृह राज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी सांगितले.
सरकारचे स्थितीवर बारकाईने लक्ष असून गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांना अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांवर नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four pro isis activists arrested in india