जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या २२ वर्षांत २७९ कमांडर्ससह ४ हजार ८१ अतिरेक्यांनी शरणागती पत्करली आह़े तसेच ते सर्वसामान्य जीवन जगत असल्याचे राज्याच्या गृहमंत्रालयाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात दिसून आले आह़े
गृहमंत्रालयाने दहशतवादासंदर्भात नोव्हेंबर २०१२ पर्यंतचा अहवाल तयार केला आह़े या अहवालानुसार या वर्षभरात केवळ एकाच अतिरेक्याने शरणागती पत्करली आह़े मात्र गेल्या वर्षी १९ आणि २०१० या वर्षी २० अतिरेक्यांनी स्वेच्छेने आत्मसमर्पण केले आह़े शरणागतीचे हेच प्रमाण २००९ साली १५, २००८ साली ३८, २००७ साली १२२, २००६ साली १९०, २००५ साली ६४, २००४ साली १३७, २००३ साली ११९, २००२ साली १५९, २००१ साली ८५ आणि २००० साली १०४ इतके होते, असेही अहवालातून दिसून आले आह़े
अतिरेकी कारवायांतून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी जम्मू आणि काश्मीर शासनाने धोरणनिश्चिती केली आह़े या धोरणानुसार, शरणागतांपैकी २ हजार ८८१ अतिरेक्यांना तीन वर्षांसाठी ३ लाख रुपयांची मुदत ठेव आणि ३ हजार रुपये मासिक साहाय्यता निधी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आह़े.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा