मागील अनेक दिवसांपासून देशात हिजाबचा मुद्दा चांगलाच गाजतोय. कर्नाटक सरकारने शैक्षणिक संकुलात विद्यार्थिनींना हिजाब परिधान करण्यास बंदी घातल्यानंतर हा वाद निर्माण झाला. कर्नाटक सरकारच्या या निर्णयानंतर वेगवेगळ्या स्तरावरुन विविध प्रतिक्रिया उमटल्या. तर दुसरीकडे आता फ्रान्सच्या सर्वोच्च न्यायालयानेदेखील हिजाब परिधान करण्यावबाबत मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयात महिला वकिलांना हिजाब परिधान करण्यास बंदी घालण्याचा निर्णय फ्रान्समधील सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलाय. फ्रान्समध्ये एप्रिल महिन्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्यामुळे येथे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रॉयटर्स या वृत्तसंकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे. फ्रान्समध्ये बार काऊन्सिल ऑफ लीलीने न्यायालयात कोणतेही धार्मिक प्रतिक परिधान करण्यास बंदी घातली होती. काऊन्सिलच्या याच निर्णयाला विरोध करत फ्रेंच सिरियन वकिल सारा अस्मेता या हिजाब परिधान करणाऱ्या महिला वकिलाने हिजाब बंदीला विरोध केला होता. या महिला वकिलाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र फ्रान्स सर्वोच्च न्यायालयानेदेखील न्यायालयात हिजाब परिधान करण्यावरील बंदी कायम ठेवली आहे. हिजाब परिधान करण्यावरील बंधी ही योग्य आणि गरजेची आहे. वकिलांचे स्वातंत्र्य त्याचबरोबर भयविरहित तसेच निष्पक्ष खटल्याच्या हमीसाठी हा निर्णय योग्य आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच हिजाबवर बंदी घालणे म्हणजे भेदभाव नाही, असेदेखील मत न्यायालयाने व्यक्त केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: France high court given decision of ban on wearing hijab to women barristers prd
First published on: 03-03-2022 at 17:35 IST