Fraud Supreme Court Virtual courtroom and Fake verdict Case : प्रसिद्ध कापड उद्योगपती व वर्धमान समूहाचे चेअरमन एस. पी. ओसवाल यांना काही सायबर ठगांनी मिळून सात कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. सायबर गुन्हेगारांच्या टोळीने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी बनून बोगस आभासी न्यायदालन (Fake Virtual Courtroom) तयार केलं होतं. या टोळीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड बनून आदेशही दिले. या टोळीने सीबीआय अधिकारी बनून ओसवाल यांच्यावर जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्याशी संबंधित आर्थिक घोटाळा प्रकरणात सामील असल्याचा आरोप केला. गोयल यांना गेल्या वर्षी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली होती.

ओसवाल यांच्यावर आधार कार्डचा दुरुपयोग करून बनावट पासपोर्ट व डेबिट कार्डसह मलेशियामध्ये पार्सल पाठवणे आणि अटकेची धमकी दिल्याचा आरोप आहे. सायबर ठगांच्या टोळीने याचाच आधार घेत स्काइप कॉल करून सर्वोच्च न्यायालयाची बोगस सुनावणी केली. यामध्ये असं भासवण्यात आलं की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड या प्रकरणाची सुनावणी करत आहेत. हा सर्व प्रकार बोगस असल्याचं पुढे निष्पन्न झालं. ओसवाल यांना त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एक बनावट आदेशाचा मेसेज आला होता. यावर सर्वोच्च न्यायालयाचा शिक्का देखील होता. या खोट्या आदेशाद्वारे त्यांना एका गुप्त बँक खात्यात सात कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते.

fake power of attorney marathi news
सोलापूर : नामसाधर्म्याचा फायदा घेऊन बनावट कुलमुखत्यारपत्राद्वारे फसवणूक
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Fraud of Rs 42 lakhs through social media Navi Mumbai crime news
नवी मुंबई: समाजमाध्यमाद्वारे ४२ लाखांची फसवणूक
Supreme Court News
Supreme Court : कामाच्या ठिकाणी भेदभाव झाल्याचा ट्रान्सवुमन शिक्षिकेचा आरोप, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील निकाल ठेवला राखून
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
taloja housing project fraud case court takes serious note of the plight of flat buyers
तळोजास्थित गृहप्रकल्प कथित फसवणूक प्रकरण : सदनिका खरेदीदारांच्या दुर्दशेची न्यायालयाने घेतली गंभीर दखल
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत

फसवणूक प्रकरणाची माहिती देताना ओसवाल म्हणाले…

ओसवाल म्हणाले, स्काइपवर सर्वोच्च न्ययालयाची बोगस सुनावणी चालू असताना त्या लोकांनी न्यायमूर्तींची ओळख सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड अशी करून दिली. मात्र मला त्यांचा चेहरा पाहता आला नाही. मला ते बोलत असल्याचं व टेबलवर हातोडी मारताना दिसत होते. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची बोगस प्रत इतकी चालाखीने बनवली होती की ती तुम्हाला खरी वाटेल. त्यामुळे माझा त्या बोगस खटल्यावर, आदेशावर विश्वास बसला. त्यामुळे त्यांनी दिलेल्या बँक खात्यात मी सात कोटी रुपये भरले. मला सर्वोच्च न्यायालयाचे इतरही काही दस्तावेज देण्यात आले जे की बनावट असल्याचं माझ्या खूप उशिरा लक्षात आलं. या दस्तावेजांवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड विरुद्ध पॉल ओसवाल असं लिहिण्यात आलं होतं.

दोघांना अटक

ओसवाल यांच्या कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या खटल्यात काही गडबड असल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर ओसवाल यांनी पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी ५.२५ कोटी रुपये जप्त केले आहेत. हे पैसे ओसवाल यांच्या बँक खात्यात वळवण्यात आले आहेत. दरम्यान, ओसवाल यांची एका आंतरराज्यीय सायबर ठगांच्या टोळीने फसवणूक केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर गुवाहाटीमधून दोन आरोपींना अटक देखील केली आहे.

Story img Loader