फ्रान्समध्ये १७ वर्षीय मुलाची हत्या झाल्यानंतर तीन दिवस दंगली सुरू होत्या यावर फान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या दंगलीसाठी व्हिडीओ गेम जबाबदार असल्याचे सांगितले आहे. देशात सुरू असलेल्या हिंसेवर चर्चा करण्यासाठी आयोजित एका सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. मॅक्रॉन म्हणाले, ” ज्या मुलांना व्हिडीओ गेमचे व्यसन आहे ते प्रत्यक्ष आयुष्यातही रस्त्यावर व्हिडीओ गेममध्ये दाखवल्याप्रमाणे दंगली घडवून आणतात.”

फ्रान्सचे राष्ट्रध्यक्ष यांनी पालकांना आवाहन केले आहे की त्यांनी मुलांना घरीच सुरक्षित ठेवावे. सध्या देशात शांती प्रस्थापित करणे , ही खूप मोठी जबाबदारी आहे, त्यासाठी मुलांना हिंसेपासून दूर ठेवावे, असेही ते म्हणाले.

uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”

हेही वाचा : वाहतुकीचा नियम मोडल्यामुळे १७ वर्षांचा मुलगा पोलिसांकडून ठार, फ्रान्समध्ये नागरिकांकडून सलग तिसऱ्या दिवशी जाळपोळ, दगडफेक सुरूच

मॅक्रॉन यांनी टिकटॉक आणि स्नॅपचॅट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गंभीर आरोप लावला आहे. ते म्हणाले की या दंगली याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन सुरू झाल्या. त्यांनी या कंपन्यांना दंगली संदर्भातील संवेदनशील कंटेट हटविण्याची मागणी केली आहे. याशिवाय त्यांनी टिकटॉक आणि स्नॅपचॅट सारख्या कंपनीला सोशल मीडियावर दंगली पसरवणाऱ्या व्यक्तींची ओळख समोर आणण्याची विनंती केली आहे जे लोक या सोशल मीडियाचा चुकीचा वापर करत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार या दंगली थांबवण्यासाठी ४० हजार सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून एका रात्रभरात ८७५ लोकांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे अटक करण्यात आलेली मुलांपैकी अनेक मुले ही फक्त १४ ते १५ वर्षांची आहे.

हेही वाचा : वाहतुकीचा नियम मोडल्यामुळे १७ वर्षांचा मुलगा पोलिसांकडून ठार, फ्रान्समध्ये नागरिकांकडून सलग तिसऱ्या दिवशी जाळपोळ, दगडफेक सुरूच

फ्रान्समध्ये दंगली का होत आहे?

या दंगलीला मंगळवारपासून (२७ जून) सुरुवात झाली आहे. फ्रान्सच्या नॅनटेरेमध्ये एका १७ वर्षीय मुलाने वाहतूक नियम मोडल्यामुळे एका पोलिसाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात आला होता. त्याबाबत पोलिसानी सांगितले होते की, या मुलाने गाडी पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला होता. मात्र जेव्हा या घटनेचा व्हिडिओ समोर आला तेव्हा पोलिस खोटं बोलत असल्याचे समोर आले. यामुळे संतप्त झालेले लोक थेट रस्त्यावर उतरले.