आपला सुंदर आणि महान फ्रान्स दहशतवादापुढे कदापि मान तुकवणार नाही आणि मोडून पडणार नाही, असे फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सवां ओलँाद यांनी मंगळवारी येथे सांगितले. गेल्या आठवडय़ात शार्ली हेब्दो या व्यंगचित्र साप्ताहिकावर झालेल्या हल्ल्यापाठोपाठ ज्यू सुपरमार्केटवर झालेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या ज्यूंचे इस्रायलमध्ये दफन करण्यात आले. त्यांना ओलाँद यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच त्या हल्ल्यात जे तीन पोलीस अधिकारी हुतात्मा झाले त्यांच्या अंतिम संस्कारांवेळी ते बोलत होते. येथील भावपूर्ण कार्यक्रमात राष्ट्रगीताच्या सुरावटीच्या पाश्र्वभूमीवर ओलँाद यांनी लाल, पांढरा आणि निळ्या रंगाच्या राष्ट्रध्वजात लपेटलेल्या शवपेटय़ांवर फ्रान्सचे सर्वोच्च शौर्यपदक खोचत देश दहशतवादापुढे झुकणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. त्या वेळी मृतांचे शोकमग्न परिवारही उपस्थित होते.
आठवडय़ाभरात झालेल्या हल्ल्यांत तीन दहशतवाद्यांसह पत्रकार, पोलीस आणि अन्य नागरिक मिळून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समधील या दहशतवादी हल्ल्यांचा जगभरात निषेध नोंदवण्यात आला. फ्रान्समध्ये काढण्यात आलेल्या भव्य मोर्चामध्ये प्रमुख जागतिक नेत्यांनी उपस्थिती लावली. तर ‘शाली हेब्दो’ने संकटांवर मात करत आपला नवा अंक बाजारात आणला.
दहशतवादापुढे कदापि झुकणार नाही- ओलाँद
आपला सुंदर आणि महान फ्रान्स दहशतवादापुढे कदापि मान तुकवणार नाही आणि मोडून पडणार नाही, असे फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सवां ओलँाद यांनी मंगळवारी येथे सांगितले. गे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-01-2015 at 12:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: French president says illuminati behind terrorist attack