French woman Raped: भारतात रोज अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना घडत असताना आता फ्रान्समधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. फ्रान्समधील एका ७१ वर्षीय महिलेला तिच्याच पतीने अमली पदार्थ देऊन शेकडो लोकांकरवी तिच्यावर बलात्कार होऊ दिला. तब्बल दहा वर्ष हे घृणास्पद कृत्य सुरू होते. आता हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर पतीने आपला गुन्हा मान्य केला आहे. तसेच पत्नीला खेळण्यातल्या बाहुलीप्रमाणे वापरल्याचे पतीने मान्य केले आहे.

दक्षिण फ्रान्समधील अविग्नॉन शहरातील ७२ वर्षीय महिला गिसेल पेलिकॉट यांनी माध्यमांसमोर आपबिती कथन केली आहे. तिचा पती डोमिनिक पेलिकॉटने (७१) तब्बल दहा वर्ष तिला बळजबरीने अमली पदार्थ देऊन ती शुद्धीत नसताना तिच्यावर अनेकांना बलात्कार करू दिला. दहा वर्षांत जवळपास १०० वेळा पीडित पत्नीवर बलात्कार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच पतीने या घटनेचे हजारो फोटो आणि व्हिडीओ काढले असून ते लॅपटॉपमध्ये जतन करून ठेवले होते. तपासादरम्यान पोलिसांना ही सामग्री मिळाली आहे.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
psychiatrist sexually abused nearly hundred women in Hudakeshwar area
नागपूर : खळबळजनक! मानसोपचार तज्ज्ञाकडून शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषण…
Neil Gaiman sexual misconduct
Who is Neil Gaiman: ‘लहान मुलासमोरच माझ्यावर लैंगिक अत्याचार’, ८ महिलांचे प्रसिद्ध लेखकावर लैंगिक अत्याचाराचे आरोप
Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
Kerala Sexual Assual Case
Kerala Sexual Case : लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६४ पैकी २० जणांना अटक; ४० जणांचे नंबर वडिलांच्या मोबाईलमध्ये सेव्ह! चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
national women commission form fact finding committee in murder of a girl Inside bpo premises
‘बीपीओ’च्या आवारातील युवतीच्या खूनप्रकरणी सत्यशोधन समिती; राष्ट्रीय महिला आयोगाचा निर्णय; दहा दिवसांत अहवाल

हे वाचा >> Serial Killers women: आधी मैत्री नंतर बेशुद्ध करत खून; चार जणांना मारणाऱ्या सीरियल किलर महिलांना अटक

द इंडिपेंडट या वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार पीडित गिसेल पेलिकॉट यांनी सांगितले की, त्या लोकांनी (पती आणि इतर) माझा बाहुलीप्रमाणे वापर केला. मला कचऱ्यासारखी वागणूक दिली. आता माझी काही ओळखच राहिली नाही, असे वाटते. यातून मी बाहेर पडू शकेन की नाही, हेच मला कळत नाही. माझ्यासाठी आता सर्व काही संपले आहे. बलात्कार आणि रानटीपणाची ती दृश्य माझ्या मनात घर करून बसली आहेत.

एवढेच नाही तर एका एचआयव्हीग्रस्त रुग्णानेही आपल्यावर बलात्कार केल्याचे पीडित गिसेल यांनी सांगितले आहे. न्यूयॉर्क पोस्टने गिसेल यांची न्यायालयात दिलेली एक प्रतिक्रिया छापली आहे. त्यात त्या म्हणतात, माझा जीव धोक्यात असताना अत्याचार करणाऱ्यांपैकी एकानेही एक सेकंदाचा विचार करून ते सर्व थांबविले नाही. मला एचआयव्हीची लागण झाली कारण एक एचआयव्हीग्रस्त व्यक्तीने सहा वेळा माझ्यावर बलात्कार केला. २०११ ते २०२० या दहा वर्षांत ही अत्याचाराची मालिका सुरू होती.

पोलिसांनी गिसेल यांना वाचविले

पोलिसांनी मला या दुष्टचक्रातून बाहेर काढले असेही गिसेल यांनी सांगितले. नोव्हेंबर २०२० साली गिसेल यांच्या पतीने सुपरमार्केटमध्ये एका महिलेचा गुपचूप व्हिडीओ काढला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर घरातील संगणकाची तपासणी केली असता त्यामध्ये त्यांना गिसेल यांच्यावर झालेल्या अत्याचाराचेही व्हिडीओ पाहायला मिळाले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

न्यायालयात साक्ष देताना गिसेल यांनी सांगितले की, हे व्हिडीओ आणि फोटो पाहून मी कोसळलेच. माझे संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाले आहे. मी ५० वर्षात जे काही कमावले, ते सर्व गमावण्याची भीती आता वाटत आहे. माझ्यासाठी ही भयानक गोष्ट आहे. गिसेल न्यायालयात बोलत असताना त्यांचा पती शरमेने मान खाली घालून सर्व ऐकत होता.

rape case news
महिलांवरील अत्याचाराच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. (सांकेतिक छायाचित्र)

असे घडले अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती हा झोपेच्या गोळ्याची पूड करून ती पत्नीच्या जेवणात किंवा वाईनमध्ये टाकत असे. त्यानंतर ऑनलाईन चॅटरुमद्वारे काही जणांशी संपर्क करून तो पत्नीवर बलात्कार करण्यासाठी लोकांना बोलवत असे. पती डोमिनिक याच्यासह २६ ते ७४ वय असलेल्या ५० लोकांवर याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे.

टेलिग्राफने दिलेल्या बातमीनुसार, आरोपी पती डोमिनिक आणि इतर १४ लोकांनी बलात्कार केल्याचे मान्य केले आहे. तसेच इतर ३५ लोकांनी आरोप फेटाळून लावले आहेत. महिलेने लैंगिक संबंध ठेवण्यासाठी संमती दिली होती, असा दावा या लोकांनी केला आहे.

Story img Loader