इजिप्तचे पदच्युत अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांचे समर्थक आणि लष्कर यांच्यात लष्कराच्या मुख्यालयाबाहेरच झालेल्या धुमश्चक्रीत किमान ५४ जण ठार झाले असून, हंगामी अध्यक्षांनी पुढील वर्षांच्या सुरुवातीलाच नव्याने निवडणुका घेण्याचा निर्धार केला आहे.
इजिप्तचे हंगामी अध्यक्ष अदली मन्सूर यांनी सोमवारी घटनात्मक घोषणा करताना आपल्याकडे मर्यादित अधिकार ठेवले असून पार्लमेण्ट आणि अध्यक्षांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मन्सूर यांनी केलेली घटनात्मक घोषणा अध्यक्षांच्या निवडीनंतर समाप्त होणार आहे.
अध्यक्षीय निवडणुकांपूर्वी हंगामी राजवटीतच पार्लमेण्टच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यातच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक यांना २०११ मध्ये पदच्युत करण्यात आल्यानंतर कैरोमध्ये सोमवारी रक्तरंजित क्रांती घडली.

Story img Loader