नेपाळमधील विध्वंसक भूकंपानंतर सोमवारी पुन्हा बिहार आणि पश्‍चिम बंगालमध्ये भूकंपाचे हादरे बसल्याची माहिती समोर आली आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास जलपैगुडी, दार्जिलींग आणि पश्चिम बंगालच्या इतर काही जिल्ह्यांमध्ये ५.१ रिश्‍टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसले आहेत.
मधुपूरा, मधुबनी, पाटणा, कटियार, सहारसा, सिलिगुडी आणि आसाममधील काही भागांमध्ये देखील हा धक्का जाणवला आहे. या हाद-यांमध्ये कोणतीही मानवहानी किंवा संपत्तीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आलेले नाही. शनिवारी झालेल्या ७.९ रिश्‍टर स्केलच्या भूकंपानंतर उत्तर भारत आणि नेपाळमध्ये अजूनही काही धक्के बसत असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. दरम्यान, नेपाळमध्ये सुरू असलेल्या मदतकार्याला वेग आला असून मृतांचा आकडा ३७०० च्यावर गेला आहे. एनडीआरएफचे जवान मोठ्या शर्थीने ढिगाऱयातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Story img Loader