मित्रांसोबत नदीकाठी सेल्फी काढण्याच्या नादात एका १६ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. झारखंडमधील सिंगभूम जिल्ह्यात ही घटना घडली आहे. मित्रांसोबत सेल्फी काढत असताना नदीत बुडून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विक्रांत सोनी आपला भाऊ आणि चार मित्रांसोबत जमशेदपूरमधील बागबेडा पोलीस स्टेशन हद्दीतील खारखाई नदीच्या बडोदा घाटावर गेला होता. यावेळी सेल्फी काढत असताना पाय घसरुन तो नदीत पडला आणि वाहून गेला असं पोलिसांनी सांगितलं आहे.

विक्रांत नदीत पडल्यानंतर त्याचे मित्र घाबरले आणि पळून गेले. मात्र त्याचा भाऊ त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. काही वेळाने विक्रांतचा भाऊदेखील नदीत बुडू लागला होता. पण स्थानिकांनी धाव घेत त्याला वाचवलं असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. पाण्यात वाहून गेलेला विक्रांतचा मृतदेह दोन तासांनी सापडला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Story img Loader