भारतीय जनता पक्ष(भाजप) आणि काँग्रेसमधील शाब्दिकयुद्ध दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना विहरीतून बाहेर पडलेल्या बेडकाशी केल्यानंतर आता, भाजपने खुर्शिद यांची तुलना झुरळाशी केली आहे.
भाजपच्या प्रवक्त्या मिनाक्षी लेखी म्हणाल्या, “सलमान खुर्शिद हे भारताचे परराष्ट्र मंत्री नाही, तर परराष्ट्राचे मंत्री असल्यासारखे वाटतात. पाकिस्तानने भारतावर जर अण्वस्त्र हल्ला केल्यास, यातून फक्त एक जण जिवंत राहील आणि ते म्हणजे सलमान खुर्शिद. कारण, फक्त झुरळच अण्वस्त्र हल्ल्यातून बचावू शकतात.”
नरेंद्र मोदींनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणावर कडाडून टीका केली होती. यावरून सलमान खुर्शिद यांनी मोदींना विहीरीतून बाहेर पडलेल्या बेडकाची उपमा दिली होती. भाजपला मोदी यांचा अभिमान वाटत असला तरी देशाला त्यांचा अभिमान वाटत नाही. मोदी यांच्या नेतृत्वाच्या मुद्दय़ावर भाजपमध्ये फूट पडली तरी त्याचा काँग्रेसला काहीच फरक पडत नाही, असेही खुर्शिद म्हणाले होते. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने खुर्शिद यांची तुलना हल्ल्यातून बचावणाऱया झुरळाशी केली आहे.
सलमान खुर्शिद हे हल्ल्यातून बचावणारे ‘झुरळ’- भाजप
पाकिस्तानने भारतावर जर अण्वस्त्र हल्ला केल्यास, यातून फक्त एक जण जिवंत राहील आणि ते म्हणजे सलमान खुर्शिद. कारण, फक्त झुरळच अण्वस्त्र हल्ल्यातून बचावू शकतात
First published on: 17-08-2013 at 03:22 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Frog remark on modi bjp hits back calls khurshid a cockroach