लष्कराच्या स्पेशल ट्रेनमधून जम्मू-काश्मीरला निघालेले सीमा सुरक्षा दलाचे १० जवान बेपत्ता झाले आहेत. पश्चिम बंगलाच्या बर्धमान ते झारखंडच्या धनबाद रेल्वे स्थानकादरम्यान हे जवान बेपत्ता झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये निघालेल्या लष्कराच्या या स्पेशल ट्रेनमध्ये एकूण ८३ जवान होते.

उत्तर प्रदेशच्या मुघलसराय रेल्वे स्थानकात ट्रेन थांबलेली असताना मोजणी केली असता १० जवान बेपत्ता असल्याचे लक्षात आले. कमांडरला कुठलीही कल्पना न देता बर्धमान ते धनबाद दरम्यान हे १० जवान गायब झाले आहेत.

आम्ही जवान फरार असल्याची तक्रार नोंदवून तपास सुरु केला आहे अशी मुघलसरायचे पोलीस निरिक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी दिली. कमांडरने मुघसरायच्या रेल्वे पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे.

Story img Loader