दोन दशकापूर्वी नोकरीसाठी केरळमधून ब्रिटनमध्ये गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याने ब्रिटनच्या निवडणुकीत इतिहास घडविला आहे. मुळचे केरळचे नागरिक असलेल्या सोजन जोसेफ यांनी मजूर पक्षाकडून निवडणूक लढवित दिमाखदार विजय मिळविला. ॲशफोर्ड या हुजूर पक्षाच्या बालेकिल्ल्यातून निवडणूक लढवत असताना जोसेफ यांनी हुजूर पक्षाचे ज्येष्ठ नेते डॅमियन ग्रीन यांचा पराभव केला. या विजयानंतर ब्रिटनच्या संसदेत प्रवेश करणारे सोजन जोसेफ हे पहिलेच केरळचे रहिवाशी ठरले आहेत.

केरळचे कोट्टयम शहर हे नर्सिंग व्यवसायाचे प्रमुख केंद्र मानले जाते. कोट्टयममधूनच दोन दशकापूर्वी जोसेफ नोकरीसाठी ब्रिटनमध्ये स्थलांतरीत झाले होते. मजूर पक्षाकडून निवडणूक लढवत असताना त्यांनी १३९ वर्षांनंतर ॲशफोर्ड येथे मजूर पक्षाचा झेंडा फडकवला आहे. शतक भरापासून या मतदारसंघावर हुजूर पक्षाचा बोलबाला होता.

Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात? महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवं वक्तव्य, म्हणाले…

अबकी बार ब्रिटनमध्ये ‘४००’ पार! निर्विवाद बहुमत मिळवणाऱ्या मजूर पक्षाचा काय आहे इतिहास?

मजूर पक्षाच्या ॲशफोर्ड मतदारसंघाच्या सोशल मीडिया पेजवर सोजन जोसेफ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते, “ब्रिटनच्या नागरिकांवर मागच्या ७० वर्षांतील सर्वाधिक कराचा बोझा लादला गेला आहे. आपली राष्ट्रीय आरोग्य सेवा कमकुवत झाली असून आपण अवैध स्थलांतराच्या प्रश्नाला हाताळण्यात अपयशी ठरलो आहोत. देशाचा पैसा नक्की जातोय तरी कुठे? आता वेळ आली आहे बदल करण्याची. त्यामुळे मजूर पक्षाला मतदान करा.”

सोजन जोसेफ यांच्या विजयानंतर त्यांच्या केरळमधील कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. जोसेफ यांचे वडील शेतकरी आहेत. सात भावंडामध्ये जोसेफ सर्वात लहान आहेत. बंगळुरूच्या आंबेडकर वैद्यकीय महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जोसेफ यांनी देहरादून येथील रुग्णालयात काही वर्ष नोकरी केली होती.

“२००१ साली जोसेफ ब्रिटनमध्ये गेले आणि तिथे सरकारी आरोग्य सेवेतील नोकरी स्वीकारली. भारतात असताना जोसेफ हे राजकारणापासून दूर होते. मात्र त्यांच्यात उत्तम नेतृत्व गुण होते. मागच्या दोन वर्षात त्यांनी ॲशफोर्डचे नगरसेवक म्हणूनही काम पाहिले होते. त्यानंतर पक्षाने त्यांना सार्वत्रिक निवडणुकीत उतरविले”, अशी माहिती जोसेफ यांची बहीण ॲलिसने दिली.

जोसेफ यांच्या पत्नी ब्रिटा यादेखील केरळमधून येतात, त्याही नर्स म्हणून काम करत आहेत. जोसेफ जोडप्याला तीन अपत्य आहेत. जोसेफ यांची बहीण ॲलिसने सांगितले की, जोसेफ यांनी यावर्षी मार्च महिन्यात केरळला भेट दिली होती. तेव्हाच त्यांनी आम्हाला निवडणुकीसंदर्भात माहिती दिली. ही निवडणूक अटीतटीची असणार असून आपला नक्कीच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.