List of Women Empowerment Schemes in India 2025 : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर एका योजनेची चर्चा चांगलीच रंगली. ही योजना होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही पात्र महिलांना निधी देणारी योजना आणली आहे. दारिद्र्यरेषे खालील आणि अल्प उत्पन्न गटातील महिलांना दिल्ली सरकार निधी देणार आहे.

महिला समृद्धी योजना काय आहे?

दिल्लीच्या या योजनेचं नाव महिला समृद्धी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना महिना अडीच हजार रुपये मिळणार आहेत. दिल्ली हे महिलांना सन्मान निधी जाहीर करणारं पहिलं राज्य नाही. महाराष्ट्र, मध्यप्रदेश यांसह इतर राज्यांममध्येही अशा प्रकारच्या योजना आहेत. आपण जाणून घेणार आहोत याच योजनांची माहिती.

लाडली बहना योजना ठरली लोकप्रिय

मध्यप्रदेशात भाजपाच्या शिवराज सिंह सरकारने २०२३ मध्ये लाडली बहना योजना आणली. सुरुवातीला या योजनेचं बजेट ८ हजार रुपये होतं. २०२४ मध्ये हे बजेट १८ हजार ९८४ कोटी रुपये करण्यात आलं. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १७ हजार कोटी रुपये महिलांच्या खात्यात वळवण्यात आले आहेत. झारखंडमध्ये ५० लाख महिलांना निधी योजनेचा लाभ मिळतो आहे. कर्नाटकमध्ये १ कोटी २५ लाख महिलांना गृहलक्ष्मी योजनेचा लाभ मिळतो आहे.

रेखा गुप्ता यांनी योजनेसाठी किती तरतूद केली आहे?

दिल्लीतल्या रेखा गुप्ता सरकारने ५ हजार १०० कोटी रुपयांची तरतूद महिला सन्मान निधी योजनेसाठी अर्थसंकल्पात केली आहे. आधारच्या E-KYC च्या अंतर्गत महिलांना पैसे मिळणार आहेत. ही योजना अद्याप सुरु व्हायची आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या अध्यक्षेत एक समिती यासाठी नेमली जाणार आहे.

राज्यमुख्यमंत्री कोण आहेत?योजनेचं नाव काय आहे?योजनेच्या अंतर्गत प्रतिमाह किती निधी ?कुठल्या वर्षी सुरु झाली योजना?
दिल्ली रेखा गुप्ता (भाजपा)महिला समृद्धी योजना २५०० रुपये २०२५ (अद्याप योजना सुरु होणे बाकी)
मध्यप्रदेश मोहन यादव (भाजपा)मुख्यमंत्री लाडली बहना योजना१२५० रुपये २०२३
महाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस (भाजपा+महायुती)मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना १५०० रुपये २०२४
झारखंड हेमंत सोरेन (JMM)मुख्यमंत्री मय्या सन्मान योजना २५०० रुपये २०२४
कर्नाटक सिद्धरामय्या (कर्नाटक)गृहलक्ष्मी योजना २००० रुपये २०२३
तामिळनाडूएम. के, स्टॅलिन (DMK)कलैगनार मगलिर उरमाई तित्तम१००० रुपये २०२३

निवडणुकीच्या पूर्वी आणल्या जातात अशा योजना

महिलांसाठी अशा प्रकारच्या योजना खास करुन निवडणूक होण्यापूर्वी आणल्या जातात. महिलांची एकगठ्ठा मतं मिळण्यासाठी या योजनांचा आधार घेतला जातो. असं कायमच सांगितलं जातं की या योजनेमुळेच मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमधे भाजपाला उत्तम यश मिळालं आहे.

Story img Loader