पैसा, प्रॉपर्टीचा विषय आला कि, अनेकदा माणसाला नात्याचा विसर पडतो. सख्खा, चुलत कसलाही पुढचा-मागचा विचार न करता आपण एका क्षणात अनेक वर्षांपासून जपलेले नाते तोडून टाकतो. काही कुटुंबांमध्ये संपत्तीचा वाद इतका टोकाला जातो कि, प्रसंगी सख्खी भावंडही एकमेकांच्या जीवावर उठतात. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील खानेवाल जिल्ह्यातही अशीच धक्कादायक घटना घडली.

बहिणीने संपत्तीत हिस्सा मागितला म्हणून संतापलेल्या भावांनी बहिणीचे पाय तोडून टाकले. मखदूमपूर चाक १ येथे राहणाऱ्या अख्तर बिबीने कौटुंबिक संपत्तीतील तिचा वाटा मागितला. पण तिच्या भावांना तिची ही मागणी पटली नाही. त्यांनी तिला नकार दिला. त्यावर अख्तर बिबीने न्यायालयात खटला दाखल करण्याची धमकी दिली.

अख्तर बिबी संपत्तीची मागणी सोडायला तयार नसल्याने संतापलेल्या भावांनी कुहाऱ्डीने तिचे पाय तोडले. या प्रकरणी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत. सध्या आरोपी फरार आहेत. मार्च महिन्यात सरगोंधामध्ये कौटुंबिक वादातून झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला होता.

Story img Loader