केंद्र सरकारने आतापर्यंत ४०.३१ कोटींहून अधिक लसमात्रा राज्ये आणि केंद्रशाशित प्रदेशांना उपलब्ध करून दिल्या असून १.९२ कोटींहून अधिक न वापरलेल्या मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे शिल्लक आहेत, असे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालच्या वतीने सांगण्यात आले.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लवकरच आणखी ८८ लाख ८५ हजार ७९० मात्रा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. उपलब्ध करून देण्यात आलेल्या मात्रांपैकी ३८ कोटी ३९ लाख दोन हजार ६१४ मात्रांचा (वाया गेलेल्या मात्रांसह) वापर करण्यात आला आहे.