FSSAI reclassifies packaged drinking water, mineral water as high-risk food : प्रवासादरम्यान आपण बऱ्याचदा बाटलीबंद पाणी (Packaged Drinking Water) खरेदी करतो. घराबाहेर पडताना घरातील पाण्याची बाटली विसरून निघालो तर बाहेर पाण्याची बाटली खरेदी करतो. या बाटलीबंद पाण्याला ‘मिनरल वॉटर’ किंवा ‘पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर’ असं संबोधलं जातं. हे पाणी शुद्ध आहे असं आपण मानतो. काही कंपन्या दावा करतात की त्यांनी यात मिनरल्स (नैसर्गिक द्रव्ययुक्त पाणी) मिसळले आहेत. या पाण्याने आपल्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही, असं आपण मानतो. अनेक घरांमध्ये पिण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी हेच पाणी विकत घेऊन वापरलं जातं. परंतु, बाटलीबंद पाणी पिणाऱ्यांसाठी आणि हे पाणी विकणाऱ्या कंपन्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने (FSSAI) म्हटलं आहे की हे पाणी आपल्यासाठी घातक ठरू शकतं. एफएसएसएआयने पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मिनरल वॉटरचं अतिधोकादायक खाद्यपदार्थांच्या श्रेणीत वर्गीकरण केलं आहे. त्यामुळे आता या पाण्याची तपासणी करणं अनिवार्य आहे. तसेच या पाण्याचं व ते पाणी विकणाऱ्या कंपन्यांचं ऑडिटही (तपाणसी) केलं जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा