इंधनाच्या दरात वाढ सुरुच असून गुरुवारी मुंबईत पेट्रोल प्रति लिटरमागे १९ पैशांनी तर डिझेल प्रति लिटरमागे २२ पैशांनी महागले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.
मुंबईत गुरुवारी पेट्रोलने एका लिटरसाठी ८६. ९१ रुपये इतका दर गाठला. तर डिझेलने एका लिटरसाठी ७५. ९६ रुपये इतका दर गाठला. दिल्लीतही पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल २१ पैशांनी महागले. दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ७९. ५१ रुपये तर डिझेलचे दर प्रति लिटर ७१. ५५ रुपये इतके आहे.
Petrol & Diesel prices in #Delhi are Rs.79.51 per litre & Rs.71.55 per litre, respectively. Petrol & Diesel prices in #Mumbai are Rs.86.91 per litre & Rs.75.96 per litre, respectively. pic.twitter.com/1Y8fKbM60D
— ANI (@ANI) September 6, 2018
प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्या वर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हापासून दररोज सकाळी ६ वाजता इंधनदराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यानुसार नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली.
पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने याचा फटका थेट सर्वसामान्यांना बसणार आहे. पेट्रोल व डिझेल महागल्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत पेट्रोलवर ३९.१२ टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) घेतला जातो.
जाणून घ्या राज्यातील प्रमुख शहरांमधील दर (प्रति लिटरनुसार)
पुणे
पेट्रोल – ८६. ७१ रुपये
डिझेल – ७६. ४० रुपये
नागपूर
पेट्रोल – ८७. ३९ रुपये
डिझेल – ७६. ४९ रुपये
औरंगाबाद
पेट्रोल – ८७. ९६ रुपये
डिझेल – ७७. ०२ रुपये