देशभरात आज (बुधवार) सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका संपल्यापासून इंधन दरात वाढ होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. कालच्या दर वाढीनंतर आज पुन्हा सरकारी इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलमध्ये प्रति लिटर मागे ८० पैशांची वाढ केलेली आहे. तर, मुंबईत इंधन दरात ८५ पैशांची वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राजधानी दिल्लीत आज पेट्रोल ९७.०१ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ८८.२७ रुपये प्रति लिटर मिळत आहे. याचबरोबर मुंबईमध्ये पेट्रोलचे दर तब्बल १११.६७ रुपये प्रति लिटर झाले असून, डिझेल ९५.८५ रुपये प्रति लिटर या दराने मिळत आहे. याशिवाय कोलकातामधील पेट्रोल दर १०६.३४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९१.४२ रुपये लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल १०२.९१ रुपये लिटर व डिझेल ९२.९५ रुपये लिटर दराने मिळत आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने तोटा भरून काढण्यासाठी देशात इंधनदरात प्रतिलिटर १५ ते २० रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आह़े. देशात ४ नोव्हेंबर २०२१ पासून इंधनदर स्थिर होत़े