इंधनाच्या दरात दररोज वाढ सुरूच आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. शनिवारी पेट्रोलचा मुंबईतला दर ८७ रूपये ७७ पैसे आहे. तर डिझेलचा दर ७६ रूपये ९८ पैसे इतका आहे. तर दिल्लीतला शनिवारचा दर ८० रूपये ३८ पैसे लिटर इतका आहे तर डिझेलचा दर ७२ रूपये ५१ पैसे इतका आहे. कालच्या तुलनेत आज पेट्रोलचे दर ३८ पैशांनी महागले आहेत.

सातत्याने घसरणारा रुपया आणि आंतराष्ट्रीयबाजारपेठेत कच्चे तेल महाग झाल्याचा परिणाम इंधन दरांवर दिसून येतो आहे. प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्या वर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हापासून दररोज सकाळी ६ वाजता इंधनदराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यानुसार नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली.

पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीवरुन मोदी सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. इंधनाच्या भडकणाऱ्या दरांविरोधात काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे.

Story img Loader