Donald Trump Reciprocal Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातल्या देशांवर आयात कर लागू केला आहे. सर्व देशांवर सरसकट १० टक्के कर लागू केले असून काही निवडक देशांवर Resiprocal Tariff लागू करण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. त्यानुसार भारतावर २६ टक्के व्यापार कर लागू झाला असून चीनवर हेच प्रमाण ३४ टक्के तर व्हिएतनामवर ४६ टक्के इतका व्यापार कर लागू करण्यात आला आहे. हे प्रमाण प्रत्येक देशाच्या बाबतीत वेगवेगळं असल्याचं दिसून येत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केली भूमिका

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “भारताच्या पंतप्रधानांचा नुकताच दौरा आटोपला. ते माझे खूप चांगले मित्र आहेत. पण मी त्यांना म्हणालो, ‘तुम्ही चांगले मित्र आहात, पण तुम्ही आम्हाला चांगली वागणूत देत नाही’. ते आपल्यावर ५२ टक्के व्यापार कर आकारतात. पण आपण मात्र त्यांच्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून जवळपास शून्य कर आकारत आलो”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

“ही दयाळू कर आकारणी”

दरम्यान, या अतिरिक्त करआकारणीचं डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केलं आहे. “मी या धोरणाला दयाळू समन्यायी व्यापार कर असं म्हणेन. हे खरंतर पूर्णपणे जशास तसे कर नाहीत. आम्ही त्यांच्याकडून आकारल्या जाणाऱ्या कराचे दर फक्त निम्मे केले आहेत. त्यांना अडचण असेल तर त्यावरचं उत्तर खूप सोपं आहे. जर तु्मची काही तक्रार असेल, जर तुम्हाला हे व्यापार कर शून्य हवे असतील तर तुम्ही तुमची उत्पादनं थेट अमेरिकेत तयार करा. इथे कोणतेही व्यापार कर नाहीत”, असं डोनाल्ड ट्रम्प पत्रकार परिषदेत म्हणाले.

कोणत्या देशावर किती टक्के Reciprocal Tariff?

देशअमेरिकेवरील कर (टक्क्यांमध्ये)ट्रम्प यांनी लागू केलेला कर (टक्क्यांमध्ये)
चीन६७३४
युरोपियन युनियन३९२०
व्हिएतनाम९०४६
तैवान६४३२
जपान४६२४
भारत५२२६
दक्षिण कोरिया५०२५
थायलंड७२३६
स्वित्झर्लंड६१३१
इंडोनेशिया६४३२
मलेशिया४७२४
कंबोडिया९७४९
यूके१०१०
दक्षिण आफ्रिका६०३०
ब्राझील१०१०
बांगलादेश७४३७
सिंगापूर१०१०
इस्रायल३३१७
फिलिपिन्स३४१७
चिली१०१०
ऑस्ट्रेलिया१०१०
पाकिस्तान५८२९
तुर्किये१०१०
श्रीलंका८८४४
कोलंबिया१०१०
पेरू१०१०
निकारागुआ३६१८
नॉर्वे३०१५
कोस्टा रिका१७१०
जॉर्डन४०२०
डॉमिनिक रिपब्लिक१०१०
न्यूझीलंड२०१०
मादागास्कर९३४७
म्यानमार८८४४
ट्युनिशिया५५२८
कझाकिस्तान५४२७
सर्बिया७४३७
लाओस९५४८
बोत्सवाना७४३७
अल्गेरिया५९३०
लिसेथो९९५०
मॉरिशियस८०४०
फिजी६३३२
लियाकटेनस्टेन७३३७
गयाना७६३८
बोस्निया७०३५
नायजेरिया२७१४
नामिबिया४२२१
ब्रुनेई४७२४
बोलिव्हिया२०१०
व्हेनेझुएला२९१५
नॉर्थ मॅसेडोनिया६५३३
घाना१७१०
मोलदोवा६१३१
अँगोला६३३२
काँगो२२११
मोझांबिक३११६
झांबिया३३१७
इराक७८३९
कॅमेरून२२११
फॉकलँड आयलँड८२४१
पापुआ न्यू गिनी१५१०
मलावी३४१७
अफगाणिस्तान४९१०
झिम्बाब्वे३५१८
सिरिया८१४१
वनुआतू४४२२
सैंट पिएरे अँड मिक्वालोन९९५०
नौरू५९३०
इक्वाटोरियाल गिनी२५१३
लिबिया६१३१
चाड२६१३
नॉरफोक आयलँड५८२९

याव्यतिरिक्तच्या इतर सर्व देशांवर सरसकट १० टक्के आयात कर लागू करण्यात आला आहे.

चीन व व्हिएतनामपेक्षा कमी दर

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर ३४ टक्केतर व्हिएतनामवर तब्बल ४६ टक्के समन्यायी व्यापार कर लागू केला आहे. अमेरिकन बाजारपेठेत भारताला चीन व व्हिएतनाम या दोन्ही देशांकडून मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागतो. याशिवाय, थायलंडवर ३६ टक्के, इंडोनेशियावर ३२ टक्के कर लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर याचा भारताला एका अर्थाने फायदाच होणार असल्याचं बोललं जात असलं, तरी इतर आशियायी देशांपेक्षा भारतावर लागू केलेला व्यापार कर जास्त आहे.