भारताची राजधानी दिल्लीत येत्या शनिवारी व रविवारी (९-१० सप्टेंबर) जी-२० शिखर परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेला जगभरातील अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. अगदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेनही उपस्थित राहणार आहेत. जी-२० परिषदेच्या निमित्ताने पाहुण्यांच्या स्वागतासाठी भारताकडून जोरदार तयारी केली जात आहे. ही तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. जगभरातील प्रमुख नेत्यांच्या पाहुणचारात कोणत्याही प्रकारची कमतरता भासली नाही पाहिजे, यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहे.

जी-२० शिखर परिषदेसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना चांदी आणि सोन्याच्या भांड्यात जेवण वाढलं जाणार आहे. खास कारागिरांकडून भारतीय संस्कृतीप्रमाणे ही भांडी तयार करून घेतली आहे. जी-२० परिषदेतील प्रतिनिधींसाठी ८ ते १० सप्टेंबर या कालावधीत दुपार आणि रात्रीच्या जेवणाचं नियोजन करण्यात आलं आहे. या प्रतिनिधींना सोन्या-चांदीच्या ताटात जेवण वाढलं जाणार आहे.

Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी

हेही वाचा- G20 Summit in India: शी जिनपिंग यांच्या अनुपस्थितीवर जो बायडेन यांची प्रतिक्रिया, म्हणाले,”मी निराश आहे, पण…”

ही भांडी नेमकी कशी असतील? याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सोन्या-चांदीच्या धातूने मढवलेली आलिशान भांडी दिसत आहेत. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.

राजधानी दिल्लीत पार पडणाऱ्या जी-२० शिखर परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला-द-सिल्वा आदि नेते उपस्थित राहणार आहेत. तथापि, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे या परिषदेला गैरहजर राहण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतची लेखी पुष्टी अद्याप झाली नाही.