बारी (इटली) : जी ७ समूहाच्या शिखर बैठकीसाठी इटलीतील अपुलिया येथे गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अनेक महत्त्वाच्या राष्ट्रप्रमुखांशी विविध विषयांवर चर्चा केली. या परिषदेस प्रथमच हजेरी लावणारे ख्रिस्ती धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचीही मोदींनी भेट घेतली.

अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, इटली आणि जपान या जी ७ समूहाच्या राष्ट्रांबरोबरच भारतासह आफ्रिका आणि आशियातील काही देशांशी संवाद साधण्याच्या ‘आऊटरीच’ धोरणाअंतर्गत या परिषदेचे निमंत्रण मिळाले आहे. युक्रेन युद्ध, पश्चिम आशियातील संघर्ष, वातावरण आणि ऊर्जा, स्थलांतरण, अन्न सुरक्षा, कृत्रिम प्रज्ञेचा वापर असे अनेक मुद्दे कार्यक्रमपत्रिकेवर आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी परिषदेच्या यजमान आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

मोदी यांनी शिखर परिषदेत पोहोचल्यावर पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भारताने घेतलेल्या महत्त्वाकांक्षी पुढाकारांची आणि करोना लशींच्या १०० कोटी मात्रा देण्याच्या भारताच्या यशाबाबत मोदींनी पोप यांना माहिती दिली.

हेही वाचा >>> आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदी पवन कल्याण

मोदी-झेलेन्स्की भेट

मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. युक्रेन युद्धाच्या सद्य:स्थितीवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. संवाद आणि सहमतीतूनच युक्रेन युद्धावर सर्वमान्य तोडगा निघू शकतो, असे मोदी यांनी सांगितले. तोडगा निघण्यासाठी लागेल ती मदत करण्याची भारताची तयारी असल्याचेही मोदी यांनी म्हणाले.

मोदी-सुनक भेट

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षी संबंधांवर चर्चा केली. व्यापार, तंत्रज्ञान आणि संरक्षण या क्षेत्रांमध्ये परस्परसंबंध वृद्धिंगत करण्याच्या दिशेने आश्वासक पावले टाकली जात असल्याचे दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे. विक्रमी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल मोदी यांचे सुनक यांनी अभिनंदन केले. तर ब्रिटनमधील आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मोदी यांनी सुनक यांना शुभेच्छा दिल्या.

मोदी-माक्राँ भेट

संरक्षण, अणुऊर्जा, अंतराळ अशा क्षेत्रांमध्ये भारत-फ्रान्स सहकार्य वाढवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमान्युएल माक्राँ यांनी म्हटले आहे. जी ७ परिषदेच्या निमित्ताने या दोन नेत्यांमध्ये द्विपक्षी चर्चा झाली. एका वर्षांत हे दोघे चार वेळा भेटले आहेत. कृत्रिम प्रज्ञेच्या क्षेत्रातील नियमनाबाबत आणि सार्वजनिक क्षेत्रातील डिजिटलीकरणाबाबत भारताने घेतलेल्या पुढाकाराचे माक्राँ यांनी या आवर्जून कौतुक केले.

Story img Loader