भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्ली येथील राजघाट येथे जाऊन गांधींना अभिवादन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, दिल्लीचे उपराज्यपाल वी. के. सक्सेना, उपराज्यपाल जगदीप धनखड यांच्यासहीत अनेक नेते राजघटावर बापूंना श्रद्धांजली अर्पण करण्यारकता पोहोचले.
“गांधी जयंतीनिमित्त मी महात्मा गांधींना नमन करतो. त्यांच्या शिकवणीमुळे आमचा मार्ग उजळत आहे. महात्मा गांधींचा प्रभाव जागतिक आहे, संपूर्ण मानवजातीला एकता आणि करुणेची भावना पुढे नेण्यासाठी प्रेरित करते. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू या. गांधींचे विचार प्रत्येक तरुणाला परिवर्तनासाठी पात्र बनवून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी बळ मिळू दे. ज्यामुळे सगळीकडे एकता आणि सद्भावना वाढेल”, असं नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं म्हणाले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजधानी दिल्लीतील राजघाट येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला सर्व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेतेमंडळ हजर असतात.
आज दिवसभर अनेक नेतेमंडल राजघाट येथे दाखल होऊन महात्मा गांधींना नमन करतील.