एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुजरातच्या गांधीनगर न्यायालयाने सोमवारी (३० जानेवारी) आसाराम बापूला दोषी ठरवलं होतं. दरम्यान, आज न्यायालयाने याप्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे आसाराम बापुला यापूर्वीदेखील एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा – “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उच्च न्यायालयाची नोटीस…”, दोन आठवड्यांत मागितले उत्तर

आता जन्मठेप मिळाली ते प्रकरण नेमकं काय?

२०१३ मध्ये सुरतमधील दोन बहिणींनी आसाराम बापू आणि नारायण साई यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. २००२ ते २००५ दरम्यान नारायण साईने वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याचे लहान बहिणीने तक्रारीत सांगितलं होतं. सुरतमधील आसारामच्या आश्रमात राहात असताना तिच्यावर बलात्कार झाला, असं पीडित मुलीने सांगितलं होतं. दुसरीकडे, मोठ्या बहिणीने तक्रारीत आसारामवर बलात्काराचा आरोप केला होता. अहमदाबाद येथील आश्रमात आसारामने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचं पीडितेनं सांगितले. दोन्ही बहिणींनी पिता-पुत्राच्या विरोधात स्वतंत्र तक्रारी केल्या होत्या.

दरम्यान, आसाराम बापू सध्या जोधपूरच्या तुरुंगात असून त्याला २०१८ मध्ये, जोधपूर न्यायालयाने त्याला एका वेगळ्या लैंगिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. २०१३ मध्ये जोधपूरच्या आश्रमात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तो दोषी ठरवण्यात आले होते.

Story img Loader