ज्या अहिंसा चळवळीने महात्मा गांधींना जगप्रसिद्ध केले व भारताला ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त केले त्या अहिंसा चळवळीच्या प्रारंभास चिनी नागरिकांचा हातभार लागला होता, अशी माहिती इतिहास संशोधक रामचंद्र गुहा यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली.
१९०६ मध्ये झांझीबारमध्ये झालेल्या जगातील पहिल्या अहिंसक शांततापूर्ण निदर्शनाच्या विस्मरणात  गेलेल्या घटनेला उजाळा देताना गुहा म्हणाले की, राजकीय बदल घडविण्यासाठी हिंसक मार्गाऐवजी शांततापूर्ण मार्गाने अहिंसक चळवळ उभारण्याचा पर्याय गांधींनी आफ्रिकेत असताना सूचवला.
पूर्व आफ्रिेकेतील झांजीबारच्या वंशवादी सरकारने आशियाई नागरिकांवर अनेक र्निबध लादणाऱ्या अध्यादेशाचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या निदर्शनाला आठ हजार भारतियांच्याबरोबरीने अकराशे चिनी नागरिक हजर होते. आशियाई नागरिकांवरील वांशिक र्निबधाविरूद्ध गांधींजीनी सुरू केलेल्या आंदोलनात भारतियांच्या बरोबरीने चिनी नागरिकांनी सहभाग घेतला.
 ११ सप्टेंबर १९०६ ला जोहान्सबर्गमध्ये झालेली ही घटना म्हणजे जगातील पहिले ९/११ म्हणता येईल. वंशवादी सरकारच्या  कायद्यामुळे आशियाई नागरिकांना तेथे मालमत्ता खरेदी करण्यास बंदी घातली होती. तसेच व्यापारावरील र्निबधाबरोबर सार्वजनिक स्थळी ओळखपत्र बाळगण्याची सक्ती केली होती.  
झांझीबार सरकारबरोबर झालेल्या करारावर गांधीजींच्या बरोबरीने तमीळ नेते थंबी नायडू व चिनी नेते लिऑन क्विन यांनी सह्य़ा केल्याचे सांगून गुहा म्हणाले की, १९०६ ते १९०९ काळात भारतीय व चिनी नागरिकांची झालेली एकजूट पाहून तेथील सरकाने आणखी कठोर र्निबध लादले. यामुळे अनेकांनी झांझीबारचा निरोप घेतला. झांझीबार सोडल्यानंतर क्विन यांनीही झांझीबारमधील चळवळीने आशियाई एकतेचा कसा जन्म झाला हे सांगितले होते. गांधीजीही आपल्या पहिल्या अिहसक चळवळीचा व तुरूंगात क्विन यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत. यानंतर गांधीजी मायदेशी परतले व स्वातंत्र्यचळवळीला त्यांनी वाहून घेतले. त्यानंतरच्या काळातही रविंद्रनाथ टागोर व जवाहारलाल नेहरू यांनी आशियाई एकतेचा पुरस्कार केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा